अहं शून्य
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
Description
दुभंगलेल्या समाजाला अभंगाची गरज आहे अभंग केवळ भाषेतून बोलत नाहीत तर अंतर्मनाची भाषा जाणतात म्हणून संतांनी अभंगातून अथांग विचार समाजाला दिला त्याच विचाराचा धागा ओढत तरुण पिढीतील अत्यंत आश्वासक कवी प्रवीण हटकर यांनी सलग अभंग रचनाच केली नाही तर अभंग प्रकारामध्ये नवीन जाणिवा ओतून ’परंपरा’ आणि ’नवता’ यांचा अनोखा संगम साधला आहे. “अहंकार चक्र उलटे फिरते !डोक्यातून जाते तळपायी !”
ह्या सहज साध्या वाटणार्या ओळी त्यांच्या खोलवर विचारसरणीला अधोरेखित करतात किंवा
“अहंकार जेव्हा संपतो संपतो | केवळ उरतो माणूस तो ॥”
ह्या साध्या ओळीतून ते मानवी जीवनाविषयीच्या मौलिक बाबी अभिव्यक्त करतात. अभंग हा तसा दुर्मिळ प्रकार पण या दुर्मिळ प्रकारातून दुर्बळ झालेल्या माणसाला सशक्तकरण्याचा आणि साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा प्रवीण हटकर यांचा हा प्रयत्न चिरंतन यशदायी होवो !
– प्रा .डॉ .प्रशांत महाराज ठाकरे
संस्थापक – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन विद्यालय





