₹300.00Original price was: ₹300.00.₹170.00Current price is: ₹170.00.
या पुस्तकातील कविता म्हणजे आखीवरेखीव शब्दशिल्प आहेत, होय शब्दशिल्पच. संवादी जातकुळीची ही कविता आपल्या लयबद्ध शब्दशिल्पांच्या चित्रमयी अक्षरलेण्यात वाचकाला सामावून घेते. मनाचा अंतर्मनाशी संवाद सुरु होतो. ब्रम्हानंदी टाळी लागते. बघता बघता एकेका शब्दांतून आपसूकच आशयसंपन्न अक्षरशिल्पांचा उत्सव कोर्या करकरीत पानांवर काव्यरुपात आपलासा होत जातो. ब्रम्हानंदी पावलेल्या त्या आशयगर्भ अक्षरावस्थेत वाचकाला जी लय सापडते, ती लय इथे पानोपानी पद्यरुपात समेवर आलीय...